Latest Marathi News

शिंदे गटावर भाजपात विलीन होण्यासाठी दबाव?

भाजपाची या खेळीने शिंदे गटातील आमदार खासदार अस्वस्थ

मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यावर त्यांनी आम्ही म्हणजेच शिवसेना असल्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी न्यायालयीन लढाई देखील लढवली जात आहे. पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघात भावी खासदार कमळाचा म्हणजेच भाजपाचा असेल अशी भूमिका घेतल्याने भाजप शिंदेगटावर भाजपात विलीन होण्यासाठी दबाव टाकत आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच बुलढाणा जिल्ह्यचा दौरा केला. या दाै-यात त्यांनी बुलढाण्याचा भावी खासदार ‘कमळा’चाच असेल, एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील सातही आमदार भाजपचेच, जिल्हा परिषदमध्ये भाजपचेच बहुमत राहणार अन् ९० टक्के पालिकाध्यक्ष आमचेच राहणार, असा निर्धार केला त्याचबरोबर शिंदे गटाचे खासदार असलेल्या मतदारसंघात केंद्रिय मंत्री भेट देत असून त्या मतदारसंघात २०२४ साली भाजपाचाच खासदार निवडून येईल असे ठामपणे सांगितले अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात देखील भाजपणे आणखी केली आहे. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. भाजपने शिंदे गटासोबत युती करताना पुढील निवडणूक शिंदे गट-भाजप युती एकत्र लढणार अशी घोषणा केली होती. मात्र भाजप प्रदेशाध्यक्षासह केंद्रीय नेतृत्वाने वेगळा सूर लावल्याने भाजपा शत प्रतिशद भाजपाचे धोरण महाराष्ट्रात राबवत असल्याची चर्चा आहे. यातून शिंदे गटातील खासदार आणि आमदार यांच्यावर भाजपात येण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला व अपात्रतेची कारवाई टाळायची असेल तर शिंदे गटाला इतर पक्षात विलीन व्हावे लागेल. ही शक्यता गृहीत धरूनच भाजपा पुढचा खासदार आमदार भाजपाचाच असेल ठामपणे सांगत आहेत.

सुरूवातीला बंडखोर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार मध्ये सामील होतील अशी चर्चा होती. पण कडू यांना मंत्रिपद न दिल्याने ही शक्यता मावळली आहे. दुसरी शक्यता मनसेत सामील होण्याची चर्चा होती. पण मनसेनेही नवीन सरकारवर टिका केल्याने ही शक्यताही धुसर आहे.त्यामुळे या गटाला भाजपात सामील होण्याशिवाय पर्याय नसल्याने भाजपा शत प्रतिशद भाजपाचा नारा देत आहे. पण यामुळे शिंदे गटात अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्यामुळे शिंदे गटाची भविष्यातील वाटचाल अवघड असेल कि सोपी हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!