Latest Marathi News
Ganesh J GIF

कोणीतरी ओढत होतं आणि ती चालत गेली…; धुळ्यात तरुणी गायब होण्यामागे कोणती ‘अदृश्य’ शक्ती?

धुळ्यात शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरमध्ये एक १८ वर्षीय तरुणी भरदिवसा गायब झाल्याने संपूर्ण जिल्हा दहशतीखाली आहे. संजीवनी राहुल वराडे असे या बेपत्ता तरुणीचे नाव असून, तिच्या बेपत्ता होण्यामागचे कारण आणि सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. या घटनेमुळे परिसरात संमोहन किंवा जादूटोण्यासारख्या चर्चांना उधाण आले आहे.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास संजीवनी आपल्या घराबाहेर पडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक वृद्ध व्यक्ती समोरून जाताना दिसत आहे. तो व्यक्ती पुढे गेल्यानंतर संजीवनीने चालायला सुरुवात केली, मात्र तिची चालणे अत्यंत विचीत्र होते. चालताना तिचा एक हात हवेत उंचावला असून, जणू काही एखादी अदृश्य शक्ती तिचा हात धरून तिला वेगाने ओढत नेत आहे, असे जाणवते. व्हिडीओमध्ये संजीवनीला कसला तरी त्रास होत असल्याचे दिसून आलं. भरदिवसा घडलेल्या या घटनेत संजीवनीची अवस्था एखाद्या गुंगीत किंवा झोपेत असलेल्या व्यक्तीसारखी दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते, हे संमोहनाद्वारे केलेले अपहरण असू शकते. मुलगी स्वतःच्या शुद्धीत नसून तिला जाणीवपूर्वक नेले गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. दुसरीकडे, तर घर सोडून गेली असावी, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, तिचा हवेत असलेला हात या प्रकरणाला अधिकच संशयाचे कारण ठरत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!