Latest Marathi News
Ganesh J GIF

भर रस्त्यात भाजप खासदार आणि पोलीस अधिकारी यांच्यात जोरदार वाद

खासदारांनी पोलिसाला विचारले कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहेस, पोलीस अधिकाऱ्यांनी दिले हे उत्तर

लखनऊ दि २६(प्रतिनिधी)- देशात बहुमताने सत्तेत असलेल्या भाजपाच्या लोकप्रतिनिधीकडून अनेकवेळा पोलिसांना दुय्यम वागणूक दिल्याचा किंवा त्यांच्याशी वाद घातल्याचे प्रकार समोर आले आहेत. सध्या फतेहपूर सिक्रीचे खासदार राजकुमार चाहर एका पोलीस निरीक्षकाशी वाद घालत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आग्रा येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यामुळे खासदार राजकुमार चाहर देखील त्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी तिथे सिकंदरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक उत्तम चंद पटेल तिथे होते. यावेळी चहर यांनी आपल्यासह कार्यकर्त्यांच्या गाड्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत सोडण्यास सांगितले. यावेळी पटेल यांनी संरक्षणमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव फक्त तुमची गाडी आता जावू शकते.इतरांच्या गाड्या आत जाणार नाहीत असे सांगितले. त्यामुळे ते कारमधून उतरले आणि पटेलांशी वाद घालू लागले. पटेल यांनी देखील हात जोडत प्रत्युत्तर दिले. चाहर यांनी यावेळी तु कोणत्या पक्षाचा आहेस तुझा बंदोबस्त करतो अशी धमकी दिली. त्यावर पटेल यांनी मी पोलीस आहे, पक्षाचा कार्यकर्ता नाही. तुमच्यासारखे लोक उद्धटपणा करू लागतात, त्यासाठीच आम्ही ड्युटीवर आलो आहोत का? असा उलट सवाल केला. यावेळी काहींनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण सोशल मिडीयावर त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची रविवारी आग्र्यात एक सभा होती. फतेहपूर सिक्री लोकसभा मतदारसंघ आग्रा जिल्ह्यात येतो. याच लोकसभा मतदारसंघातील कागरोल गावात राजनाथ सिंह यांची सभा होती. दरम्यान या प्रकारावर समाजवादी पक्षाने भाजपावर जोरदार टिका केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!