Latest Marathi News
Ganesh J GIF

मुंबई लोकलमध्ये नव-यासाठी दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी

महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, एकमेकींच्या झिंज्या धरत एकमेकींची धुलाई

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मुंबई लोकल आणि होणारी हाणामारी हे काही नवीन नाही. मुंबईतील लोकलच्या प्रचंड गर्दीमुळं वारंवार भांडण होत असतात. त्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. आता यात महिला सुद्धा मागे नाहीत अलीकडच्या काळात महिलांच्या हाणामारीचे व्हिडिओ जास्त व्हायरल झाले आहेत. आताही लोकलमधील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण होणारी हाणामारी जागेसाठी नसून नव-यासाठी आहे.

व्हायरल होणारा व्हिडिओ डोंबिवलीचा आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकावरील पूलवर चढत असताना एका प्रवाशाच्या दुसऱ्या प्रवाशाला पाय लागला. पण मूळ भांडण दोन महिलांचे होते. व्हिडीओत एका महिलेने दुसरीवर आपल्या नवऱ्यासह पळून गेल्याचा आरोप केला. आणि वाद घालू लागली तर दुसरी महिला मात्र मी हिला सोडणार नाही. ही नाटक करत आहे असं म्हणत प्रतिवाद करू लागली.अनेकजण हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पण तो पर्यंत या दोघा महिलांनी फ्री स्टाईल हाणामारी केली. यावेळी एका तरुणालाही मारहाण करण्यात आली आहे. मारहाण बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

लोकलमध्ये महिलांचा डब्यात अलीकडे हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.अगदी केस उपटणे, पर्सनी मारणे, लाथा-बुक्या या सगळ्याचा पुरेपुर वापर बायका भांडणाच्या वेळी करत असतात. काहीवेळा तर प्रकरण पोलीसांपर्यंत जाते. पण तरीही अशा भांडणात वाढ होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!