Latest Marathi News

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी आईने केली मुलींची जोरदार धुलाई

मुलगी प्रियकरासोबत दिसल्याने आईचा राग अनावर, व्हिडिओ जोरदार व्हायरल

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- नुकताच ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा झाला आहे. या दिवशी सर्वजण आपले प्रेम व्यक्त करतात. या दिवशी काहींना आपले प्रेम भेटले, पण काहींची मात्र चांगलीच फजिती झाली. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ज्यात प्रेमी युगलाची चांगलीच गोची झाली.

प्रेम दिनानिमित्त एक जोडपे हाॅटेलवर भेटले होते त्या दोघांचा गप्पा सुरू असतानाच त्यांच्या मागावर असणारी आई तिथे हजर होते. आपल्या मुलीला मुलासोबत पाहुन तिचा राग अनावर होतो आणि तिथेच ती आपल्या मुलीच्या कानाखाली लगावते. त्यानंतर आपल्या मुलीच्या प्रियकराला शिव्यांची लाखोळी वाहत चपलेने मारायला सुरूवात करते यावेळी मुलगी प्रियकराला वाचवण्यासाठी ती मध्ये पडते. पण आई तिला सुद्धा चपलेने झोडपून काढते. अनेक नेटकरी हा व्हिडीओ पाहून तरुण आणि तरुणीच्या परिस्थितीवर हसत आहेत. तर काहींना या गोष्टीचे वाईट वाटत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. तर अलीकडच्या काळात व्हॅलेन्टाईन्स वीक देखील साजरा केला जातो. या दिवसाचा अनेकांनी चुकीचा अर्थ काढल्याने जोडप्यांची फजिती झाल्याच्या अनेक घटनाचे व्हिडीओ समोर आले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!