Latest Marathi News
Ganesh J GIF

हॅलो मुरलीधर मोहोळ बोलतोय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी…

मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने मागितली तीन कोटींची खंडणी, पोलिसात गुन्हा दाखल

पुणे दि २७(प्रतिनिधी)- पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरुन दोघाजणांनी व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी याप्रकरणी संदीप पीरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांनी त्यांच्या मोबाईलवर एक अ‍ॅप डाऊनलोड करून पौड येथील बांधकाम व्यावसायिकाला भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, त्यांच्या मावसभावाचा नावाचा वापर करुन संपर्क साधत बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. भारतीय जनता पक्षाच्या युवा माेर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहचवू, अशी धमकी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी दिली. हा प्रकार २५ मार्च रोजी दुपारी १२ ते सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान घडला.बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक बडे तपास करत आहेत.

या प्रकरणी आरोपी पाटील, ताकवणे यांच्या विरुद्ध खंडणी, धमकावणे, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला होता. विशेष म्हणजे यापूर्वी देखील पुण्यात राजकीय नेत्यांच्या नावांचा वापर करून, त्यांच्या पीएचे नाव वापरून खंडणी मागितल्याचे प्रकार घडले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!