Latest Marathi News
Ganesh J GIF

एैतिहासिक! भारताचा तिरंगा चंद्रावर डाैलाने फडकला

चांद्रयान ३ मोहिम यशस्वी, विक्रमचे चंद्रावर यशस्वी लँडिंग, यशाचा देशभरात जल्लोष, चंद्र जवळ आला

बेंगलोर दि २३(प्रतिनिधी)- सारा देश आणि जग ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आणि महत्वाचा टप्पा पूर्ण करत भारताचे चंद्रयान आज चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहे. भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर लँडिग करणारा चौथा देश ठरला आहे. तर दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. सर्व देशात या यशाचा उत्साह दिसून येत आहे.

चंद्रयान ३ चे प्रेक्षपण झाल्यापासून या यशाची अनेकांना अपेक्षा होती. ती आज पूर्ण झाली आहे. भारतीय यान यशस्वीपणे चंद्रावर उतरवण्याचा महत्त्वाचा टप्पा आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी पार केला. या यशातून भारताने चांद्रयान २ मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश पुसून काढण्यात यश मिळवले आहे. इस्त्रोनं सतीश धवन प्रक्षेपण केंद्र श्रीहरी कोटा येथून १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चे प्रक्षेपण केलं होतं. विक्रम लँडरच्या लँडिंगची सर्व प्रक्रिया लँडरवरील संगणकाच्या नियंत्रणाखाली पार पडली. पण शेवटचा टप्पा लँडर स्वतः पार करणार होते. आणि तोच टप्पा अतिशय महत्वाचा होता. दरम्यान यावेळी भारताने ऑर्बिटर न पाठवता प्रॉपल्शन मॉड्यूल पाठवलं होते. त्यामध्ये देखील अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक राहिले आहे. या इंधनाचा उपयोग करून हे मॉड्यूल चंद्राभोवती पुढील किमान सहा महिने फिरत राहून पृथ्वीचा अभ्यास करणार आहे. त्यामुळे भारत चंद्राच्या लपलेल्या भागातून महत्वाची माहिती गोळा करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अलिकडेच रशियाने लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि रशियाची मोहीम अपयशी ठरली होती. त्यामुळे भारताच्या मोहिमेकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. लँडिंग यशस्वी झाल्यानंतर देशभरात सेलिब्रेशन करण्यात येत आहे. तसेच पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी या यशाबद्दल इस्त्रोचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडिया फक्त चांद्रयान-३ बद्दलच्या यशाने बहरलेले दिसत आहे.

इस्त्रोच्या या यशात इस्रोचे अध्यक्ष असलेले एस. सोमथान, परियोजना निर्देशक पी. वीरमुथुवेल, निर्देशक मोहन कुमार, एम. शंकरन, एस. उन्नीकृष्णन, आणि शेकडो शास्त्रज्ञांचा समावेश आहे. सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर चांद्रयान-३ ने एक संदेश पाठवला आहे. “मी यशस्वीपणे चंद्रावर पोहोचलो आहे, आणि माझ्यासोबत संपूर्ण भारत याठिकाणी पोहोचला आहे”; असा संदेश पाठवला आहे. इस्रोने पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!