Latest Marathi News
Ganesh J GIF

लिव्ह ईनमध्ये राहणाऱ्या तरुणीची प्रियकराने केली हत्या

हत्याकांडाने उडाली खळबळ, आरोपीचे आत्मसमर्पण, आईच्या आरोपाने पोलिसही हैराण

लखनऊ दि २३(प्रतिनिधी)- भारतात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद होण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. आता लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असलेल्या जोडप्यात झालेल्या किरकोळ वादातून प्रियकारानं प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

लखनौच्या उच्चवस्तीत परिसरातील सुशांत गोल्फ सिटीमधील पॅराडाइज क्रिस्टल अपार्टमेंटमधील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिया शर्मा असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. रिया ही व्यावसायाने मेकअप आर्टिस्ट होती. त्याचसोबत सोशल मीडियात बरीत एक्टिव्ह होती. इन्स्टावर तिचे लाखो फोलोअर्स होते. ऋषभ सिंह असे आरोपीचे नाव आहे. रियाचा घटस्फोट झाला होता, व ती अनेक महिन्यांपासून आरोपीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. घटनेच्या दिवशी रिया आणि ऋषभमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला होता. त्यावेळी ऋषभने रियावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या, त्यातच तिचा मृत्यू झाला. हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आरोपीने मुलीच्या छातीत आणि डोक्यात गोळी झाडली. आता पोलीस नेमका कोणत्या गोष्टीवरून वाद झाला याची माहिती घेत आहेत. विशेष म्हणजे ऋषभने गुन्हा केल्यानंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

एका पार्टीत ऋषभसोबत रियाची ओळख झाली होती. त्यावेळी तिच्या ड्रिंकमध्ये ऋषभने गुंगीचे औषध दिले होते. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करणे सुरु केले. तिला ऋषभसोबत राहायचे नव्हते परंतु ब्लॅकमेल करून रियाला त्याच्यासोबत राहायला भाग पाडत होता असा आरोप रीयाच्या आईने केला आहे. त्यामुळे याचा गुंता वाढला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!