Latest Marathi News

शेवाळेवाडीत १९ नोव्हेंबरला रंगणार होम मिनिस्टरचा काॅमेडी तडका

उद्योजक राजन टकले आणि प्रथम टकले यांची महिलांसाठी काैतुकास्पद संकल्पना

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा ‘सुभाष यादव प्रस्तुत कॉमेडी तडका होम मिनिस्टर’ कार्यक्रम प्रसिद्ध उद्योजक राजन नाना टकले व युवा उद्योजक प्रथम दादा टकले यांनी आयोजन केला आहे. होम मिनिस्टर कार्यक्रम 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत सोलापूर रोडवरील शेवाळवाडी फाटा, नंदिनी टकले नगर येथे आयोजित करण्यात आला आहे. कॉमेडीचा बादशहा म्हणून ओळख असलेले व प्रसिद्ध अभिनेता ऐंडव्होकेट सुभाष यादव हे कॉमेडी तडका होम मिनिस्टर’ हा शो सादर करणार आहे. प्रसिद्ध उद्योजक राजन नाना टकले व युवा उद्योजक प्रथम दादा टकले यांच्या संकल्पनेतून हा नंदिनी टकले नगर मध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले आहे

या कार्यक्रमासाठी प्रमुख सेलिब्रिटीं पैकी (फुलपाखरु फेम) ऋता दुर्गुळे , (स्वराज्य रक्षक संभाजी फेम येसूबाई) प्राजक्ता गायकवाड, (तुझ्यात जीव रंगला फेम)
माधुरी पवार , (देव माणूस फेम सरु आजी) रुक्मिणी सुतार , (बबन,एकदम कडक फेम) गायत्री जाधव , (बॉलीवूड अभिनेत्री ) आयली घिया, (सांज फेम) मयुरी घाडगे , (मार्तंड मल्हारी फेम) प्रमाला साळुंखे, (मॉडेल अभिनेत्री) रश्मी दहिरे ,(एकदम कडक फेम) जयश्री सोनुने या सेलिंब्रिटींसोबत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या भव्य दिव्य होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी गेल्या १० दिवसापासून जय्यत तयारी सुरु आहे. नंदिनी टकले नगर तसेच पंचकृषीतील नागरिकांनी कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी व बक्षिसे जिंकण्यासाठी तसेच आपल्या आवडत्या सेलिंब्रिटी सोबत सेल्फी घेण्यासाठी उपस्थिंत राहावे अशी विनंती श्री राजननाना टकले यांनी केली आहे.

या कार्यक्रमासाठी प्रथम उपस्थित 5000 महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तसेच प्रथम क्रमांकासाठी पैठणी व वॉशिंग मशीन, द्वितीय क्रमांकासाठी 32इं ची एलर्डडी टीव्ही, तृतीय क्रमांकासाठी ओवन व इतर सात बक्षिसे म्हणजेच एकूण दहा मोठी बक्षिसे व सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहभागी महिलांसाठी लकी ड्रॉ च्या माध्यमातून तीन विजेत्या महिलांना पुणे शहर दर्शन हेलिकॉप्टर द्वारे सप्रेम मेट देण्यात येणार आहे व त्यासाठी कार्यक्रमस्थळी उपस्थिंती अनिवार्य आहे. प्रवेश विनामूल्य असून लहानांपासून आजी-आजोबांपर्यंत सर्व प्रेक्षक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नंदिनी टकले नगर येथील नंदिनी बेलस या ऑफिसमध्ये नोंदणी सुरु करण्यात आली असून तेथे आपले नाव विनामूल्य नोंदवावे अशी विनंती प्रथमदादा टाकले यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!