‘माझ्यासोबत येऊन राहा नाही तर पोलिसांत तक्रार करेन’
प्रेयसीच्या हट्टामुळे वैतागलेल्या प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल
पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुण्यातील पिंपरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. प्रियकराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरीमधील वाकड परिसरात घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

विकास विलास माळवे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षाभरापासून विकास आणि संबंधित महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. ती महिला पती सोबत रहात नाही तिचा पती मुंबईत असतो. तसेच या महिलेला दोन मुली देखील आहेत. विकास हा एका व्यावसायिक आहे. संबंधित महिला त्याच्याकडे सतत घर चालवण्यासाठी पैशांची मागणी करायची. त्याचबरोबर “तू जर कुणाशी विवाह केला तर तुझी तक्रार थेट पोलिसांत करेन त्यामुळे मी असं काही करायच्या आत तू माझ्या सोबत येऊन रहा”, अशी मागणी ती विकासकडे करायची. तिची ही मागणी वारंवार वाढल्याने विकासाला याचा मानसिक त्रास होऊ लागला होता. याच त्रासाला कंटाळून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी विकासने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात महिला देत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. ती प्रेस नोट पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत. प्रेयसीच्या तगाद्यामुळे तरूणाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.