Just another WordPress site

फुरसुंगीत ऑफिस कर्मचाऱ्याचं विधवा महिलेसोबत भयंकर कृत्य

हडपसर पोलीसांकडुन आरोपीला अटक, मुलाला मारण्याची धमकी देत महिलेसोबत...

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुण्यातील फुरसुंगीत एका विधवा महिलेला एकाच कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्याने महिन्यातून ३ वेळा भेटण्याची धमकी देत न भेटल्यास तुझ्या मुलाला मारून टाकीन आणि तुझ्या नातेवाईकांसमोर तुझी बदनामी करेन आणि तुला उचलून घेऊन जाईल अशी धमकी देणाऱ्या एकावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

GIF Advt

मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत महिला पतीच्या निधनानंतर तो काम करीत असलेल्या ठिकाणी नोकरी करते.त्या ठिकाणी तिची ओळख संतोष चंद्रकांत काळभोर याच्याबरोबर झाली. जुन्या ओळखीतून काळभोरने विधवा महिलेला ‘तू माझ्यासोबत प्रेम करणार नसशील, तर मी तुझ्या घरी येऊन नातेवाईकांना सांगेन आणि तुझी बदनामी करेल,’ अशी धमकी दिली. एवढच नाही तर त्याने महिलेला जबरदस्तीने मिठी मारून लगट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काळभोरने महिलेला मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच दरवेळी तुझ्या मुलाला मारून टाकीन आणि तुला उचलून घेऊन जाईल अशी धमकी द्यायचा. हा प्रकार २०१८ ते २८ डिसेंबर २०२२ दरम्यान घडला. अखेर महिलेने त्रासला कंटाळून फिर्याद दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी काळभोर याला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक उमरे यांनी सांगितले आहे.

पुण्यात अलीकडे कोयता गँग दहशद माजवत असताना कुठे तरी रोड रोमियोचा प्रकार ही दिवसांदिवस वाढत आहे. त्याचबरोबर महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असताना पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे महिला सुरक्षेचे काय असा प्रश्न उपस्थित आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!