Latest Marathi News
Ganesh J GIF

‘…तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत युती करणार’

प्रकाश आंबेडकरांनी घेतली एकनाथ शिंदेची भेट,उद्धव ठाकरेंना दिला सल्ला

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे. उद्धव ठाकरे यांना आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर त्यांनी शिंदेची भेट घेतल्याने त्या भेटीला महत्व प्राप्त झाले होते यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे यांच्या पक्षाबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने तर्क-वितर्क लढवले जात होते. याबाबत आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले ‘भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करू शकत नाही. त्याचबरोबर भाजपसोबत असलेल्या पक्षाशीही युती करू शकत नाही. मात्र शिंदे यांच्या पक्षाने भाजपची साथ सोडल्यास युतीचा विचार केला जाऊ शकतो,’ असे मोठे वक्तव्य आंबेडकर यांनी केले आहे. त्याचबरोबर ‘उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी युती करावी, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मी चांगलं ओळखतो. त्यांना माझ्याएवढं ओळखणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने आमचा खिमा केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता तिथं थांबू नये,’ असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे मोठी राजकीय अनिश्चितता समोर आली आहे.

आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात होती, असे स्पष्ट केले आहे. तर चार भिंतीमधील भूमिका उद्धव ठाकरे हे जाहीर का करत नाहीत, हे त्यांनाच माहीत आहे,’ असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी नेमकी कोणासोबत युती करणार की स्वबळावर लढणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!