Just another WordPress site

मराठी चित्रपटातील त्या रोमँटिक सीनबद्दल अभिनेत्री म्हणाली…

या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला,म्हणाली मैत्रीचा आधार घेत...

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- हास्यजत्रा या काॅमेडी शोमधुन लोकप्रिय झालेला कलाकार ओंकार भोजने लवकरच ‘सरला एक कोटी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री ईशा केसकर ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आणि गाणी सध्या सुपरहिट ठरताना दिसत आहे. त्यातील एका सीनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.


सरला एक कोटी चित्रपटातील केवडयाचं पान तू या गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या गाण्यातील रोमँटिक सीनवरुन अनेक चर्चा रंगताना दिसत आहे. त्याबद्दल नुकतंच ईशा केसकरने प्रतिक्रिया दिली आहे. ”केवड्याचं पान तू हे गाणं शूट करताना एक वेगळी जबाबदारी होती. याआधी मी कधीही रोमँटिक सीन किंवा दृश्याचे सीन शूट केला नव्हता. पण मग त्यावेळी मी माझी आणि ओंकारच्या मैत्रीचा आधार घेतला. मग ते गाणं शूट केलं”, अशी माहिती ईशा केसकरने दिली आहे. प्रेक्षकांना टीझरमधील इशा केसकरचा लूक पाहून चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. ”सरला एक कोटी” या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केलं आहे हा चित्रपट येत्या २० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

GIF Advt


‘जय मल्हार’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’सारख्या मालिका ‘शेर शिवराज’, ‘गर्लफ्रेंड’ यांसारख्या चित्रपटातून ईशाने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ईशा केसकर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिच्या बोल्डनेसमुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.या चित्रपटातल्या तिच्या भूमिकेविषयी देखील उत्सुकता असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!