लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराचे प्रेयसीशी भयानक कृत्य
वसईतील तरुणीची दिल्लीत हत्या, हत्येसाठी असा रचला कट
दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- मुंबई वसईतील एका तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीत हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून देत पुरावे नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येच्या सहा महिन्यांनंतर हा गुन्हा उघडकीस आला आहे.श्रद्धा वालकर असे आत्महत्या झालेल्या तरूणीचे नाव आहे तर तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला यानेच तिची हत्या केली आहे. हत्येचा घटनाक्रम एखाद्या सिनेमाला लाजवण्यासारखा होता.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाचे वसईतच राहणाऱ्या आफताब पुनावालाशी प्रेमसंबंध होते.तिने या संबंधांची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली होती. मात्र कुटुंबियांनी त्यांच्या आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला विरोध केला होता. पण प्रेमात वेडी झालेल्या श्रद्धाने आई-वडीलांचा विरोध डावलून आफताबबरोबर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले. मार्चमध्ये ते दोघे दिल्लीला राहायला गेले. तेव्हापासून तिचा कुणाशीही संपर्क नव्हता. तिच्या एका मित्राने तिच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तिच्या वडिलांना माणिकपूर पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली. पोलीसांनी आफताबची चाैकशी केली असता त्याने ‘‘ती भांडण करून घरातून निघून गेल्याचे सांगितले. पण पोलीसांनी कसुन चाैकशी केली असता हत्येचा प्रकार उघडकीस आला.
श्रद्धा आणि आफताब दिल्लीत छत्तरपूर परिसरात भाडय़ाच्या घरात रहात होते. तिने लग्नाचा तगादा लावल्याने आफताबने तिची मेमध्ये गळा दाबून हत्या केली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. दररोज रात्री मृतदेहाचा एकेक तुकडा घेऊन तो मेहरोलीच्या जंगलात नेऊन फेकत असे. एक बेवसीरिज पाहून त्याने तिच्या हत्येचा कट रचला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, असे पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.