या अभिनेत्रीने शेअर केला खास व्यक्तीबरोबरचा व्हिडिओ
व्हिडिओ तुफान व्हायरल, व्हिडीओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- प्रार्थना बेहरे ही मराठी विश्वातील सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपट आणि आता मालिकांमुळे प्रार्थना बेहरे नावारुपाला आली आहे . तीची माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकाच्या पसंतीत उतरत आहे.त्याच बरोबर ती सोशल मिडीयावर सक्रिय असते. आज तिने सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या नवऱ्याबरोबरचा एक रोमँटिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याचे कारणही तसेच खास आहे.

प्रार्थनाने १४ नोव्हेंबर २०१७ मध्ये अभिषेक जावकर बरोबर लग्नगाठ बांधली होती. आज त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने तिने पती अभिषेक बरोबरचे काही रोमँटिक आणि गमतीदार क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या व्हिडीओतून त्यांच्यातील प्रेम दिसून आले होते. प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओत प्रार्थना आणि अभिषेकबरोबर छान वेळ घालवताना दिसत आहेत. प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओत सारेकाही कपल मोमेंट त्यांनी शेअर केले आहेत त्यात ते नाचत आहेत गाणी गात आहेत. मस्करी आणि चिडवतानाही दिसत आहेत. विशेष म्हणजे एकमेकांचा गळाही धरला आणि मग नंतर मिठी मारली. हा व्हिडीओ पोस्ट करत प्रार्थनाने कॅप्शनमध्ये लिहिले, “हॅप्पी ५.”असे लिहित लग्नाची पाच वर्ष आनंदात गेली असे सांगत आहे.
प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्याने काम केले आहे. तसंच त्याचे काही मराठी चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. दरम्यान व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत त्यांचे मित्र मंडळी, प्रार्थनाचे चाहते त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.