शिवसेना पक्ष आणि चिन्हाची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात
ठाकरे गटाची याचिका न्यायालयाने स्वीकारली, शिंदे गटासाठी लढाई अवघड?
दिल्ली दि २१(प्रतिनिधी)- निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता कायदेशीर लढाई रंगणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी सांगितले की, बुधवारी म्हणजेच उद्या दुपारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्याण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. तर या याचिकेवर कोणताही अंतरिम आदेश किंवा निकाल देण्याआधी आमचेही म्हणणे ऐकून घ्यावे, असा अर्ज मुख्यमंत्री शिंदे यांच्यावतीने करण्यात आला आहे. पक्ष आणि चिन्हानंतर विधिमंडळ आणि संसदेतील कार्यालय देखील शिंदे गट ताब्यात घेत असताना सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करत घेत ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. आता ठाकरेंची सगळी भिस्त न्यायालयावर अवलंबून असणार आहे.
लोकप्रतिनिधींची संख्या शिंदे गटाकडे अधिक आहे. तसेच २०१८ मध्ये शिवसेनेच्या घटनेत बदल केला गेला. हा बदल आयोगाला कळवण्यात आला नाही. २०१८ मध्ये झालेल्या घटना बदलात अध्यक्षांना एकाहाती अधिकार देण्यात आले आहेत. मुळात अशाप्रकारची घटना सन १९९९ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती. ती घटना आयोगाने मान्य केली नाही.