Latest Marathi News
Ganesh J GIF

मुलीच्या अपहरणाच्या धक्क्याने पती पत्नीची आत्महत्या

अपहरण करणाऱ्याच्या घरासमोरच आई-वडिलांवर अंत्यसंस्कार, व्हिडिओ व्हायरल

नाशिक दि ३०(प्रतिनिधी)- मुलीच्या प्रियकराने डोळ्यासमोर अपहरण केल्याचा धक्का बसल्याने आई-वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली आहे. ज्या तरूणाने मुलीचे अपहरण केले त्याच्या घरासमोरआई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

निवृत्ती खातळे आणि मंजुळा निवृती खातळे असे आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी निवृत्ती खातळे हे आपली पत्नी मंजुळा खातळे आणि मुलीसह भरविहिर गावाकडं जात होते. वाटेत घोटी हायवे जवळ समाधान झनकर आणि त्याच्या साथीदारांनी खातळे यांची गाडी अडवली. आणि मुलीला आई-वडिलांसमोरच आपल्या वाहनात बसवून घेऊन गेले. यामुळे निराश झालेल्या खातळे दांपत्याने भगूर येथील नूतन शाळेमागे गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेत आपले जीवन संपवले. यानंतर सिन्नर पोलीस ठाण्यात मुलीचे मामा दिगंबर शेळके यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्या तरुणा विरोधात अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर घटनेची नाशिकरोड लोहमार्ग पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप भालेराव आणि शैलेश पाटील तपास करत आहेत. दरम्यान मृतदेहाच्या अंतिम संस्काराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

यानंतर संतप्त नातेवाइकांनी आणि भरविहिर बुद्रुक येथील गावकऱ्यांनी सोमवारी मृतदेह ताब्यात घेतला आणि ते सर्वजण थेट समाधान झनकर याच्या घरासमोरच पोहचले. आणि घरासमोरच खातळे दाम्पत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!