Latest Marathi News
Ganesh J GIF

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

आजाराशी झुंज अपयशी, दोन दिवसापूर्वीच वडिलांचे निधन, काँग्रेसचा आक्रमक नेता हरपला

दिल्ली दि ३०(प्रतिनिधी)- काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते ४७ वर्षाचे होते. धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर आणि दोन मुले असा परिवार आहे.

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. २६ मे रोजी त्यांना नागपुरमधील रूग्णालयात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण त्यांची आजाराशी असलेली झुंज अपयशी ठरली. दोन दिवसांपूर्वीच बाळू धानोरकर यांच्या वडिलांच निधन झालं होतं. मात्र आजारपणामुळे वडिलांच्या अत्यंसंस्कारालाही ते उपस्थित राहु शकले नव्हते. त्यानंतर आता धानोरकर यांच्या कुटुंबियांवर दुसरा आघात कोसळला झाला आहे. धानोरकर यांच जन्म ४ मे १९७५ साली झाला होता. भद्रावती नगरपालिकेपासूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली. शिवसेनेत राहत त्यांनी वरोरा मतदारसंघातात आपला जनाधार वाढवला. त्यामुळेच त्यांनी २०१४ साली ते वरोरा मतदारसंघातून निवडून आले. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता. विशेष म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीवेळी त्यांना काँग्रेसकडून अगदी अनपेक्षितपणे लोकसभेचे तिकीट देण्यात आले. आणि त्यानंतर ते राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या निधनाने काँग्रेसची राज्यातील खासदारांची संख्या शून्यावर आली आहे. आक्रमक आणि स्पष्टवक्ता म्हणून बाळू धानोरकर हे राजकीय वर्तुळात ओळखले जायचे.

धानोरकर यांच्या पत्नी आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ट्विट करुन दिलेल्या माहितीनुसार,  बाळू धानोरकर यांचे पार्थिव आज चंद्रपुरात आणण्यात येणार आहे. आज दुपारी २ वाजल्यापासून ३१ मे सकाळी १० वाजेपर्यंत अत्यंदर्शन पार्थिव देह ठेवण्यात येणार आहे. तर ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता वणी-वरोरा बायपास येथील मोक्षधाममध्ये अत्यंसंस्कार होणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!