Latest Marathi News
Ganesh J GIF

‘मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लवकरच मारून टाकेल’

मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

लखनऊ दि २५(प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर लखनौमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनौ पोलिसांनी ‘डायल ११२’ वर संदेशाद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्यामुळं युपी एटीएससह सर्व यंत्रणा ह्या सतर्क झाल्या आहेत.

फोन करणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात लखनऊमध्ये गुन्हा हा दाखल करण्यात आला आहे. फोन करुन आरोपीने मी लवकरच मुख्यमंत्री योगींना ठार मारणार आहे. असे म्हटले. यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्याविरूध्द कलम ५०६ आणि ५०७ आयपीसी आणि ६६ आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देणारा अज्ञात कोण आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान २३ एप्रिलच्या रात्री व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ११२ वर एक मेसेज आला. हा संदेश संपर्क अधिकारी शिखा अवस्थी यांनी पहिला, ज्यामध्ये सीएम योगी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या मेसेजचा स्क्रिन शॉट घेतला आणि तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. युपीत प्रयागराजमध्ये अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर ही धमकी आल्याने पोलीस त्या बाजूनेही तपास करण्याची शक्यता आहे.

एक आठवड्यापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली होती. ही फेसबुक पोस्ट बागपला राहणारे अमन रजा यांच्या प्रोफाईलवरून शेअर करण्यात आली होती. ही पोस्ट व्हायरल झाली होती. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत आरोपीला अटक केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!