‘१०० बापांची पैदास नसेल, तर आरोप सिद्ध करा’
मोहित कंबोज यांना भास्कर जाधव यांचे खुले आव्हान, फडणवीसांवर टिका
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर रोज नवनवे खुलासे होत आहे. आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना त्यांच्या गटात सामील होण्यासाठी १०० कॉल केले होते असा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना जाधव यांची जीभ घसरल्याचे दिसून आले.
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. पहिल्या दिवशी भास्कर जाधव आणि फडणवीस यांच्यात वाद झाला होता त्यानंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना त्यांच्या गटात सामील होण्यासाठी १०० कॉल केले होते, पण भास्कर जाधव हे विश्वास ठेवण्यात योग्य नसल्यामुळे त्यांना शिंदेनी सोबत घेतले नाही, असा दावा केला होता. त्यात भर म्हणजे जाधव यांनी गुवाहाटीचे तिकीट सुद्धा काढले होते असाही दावा केला होता, त्याला आता आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्यतर दिले आहे.’१०० बापांची पैदास नसेल, तर त्याने एक तरी आरोप सिद्ध करावा, असं खुलं आव्हान भास्कर जाधव यांनी मोहित कंबोज यांना दिलं आहे. ‘राज्यातील सभ्यपणाचं राजकारण संपत चाललं आहे. व्यक्तीगत कोणी बोलू नये असं माझं मत आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चांगलं नेतृत्व म्हणून पाहत होतो. परंतु ते भयंकर सुडाचे राजकारण करणारी व्यक्ती आहेत. वास्तविक असे आरोप होतात, त्या व्यक्तीने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, असे म्हणत जाधव यांनी फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. यावेळी जाधव यांनी आपण ठाकरेंसोबत असल्याचा अभिमान असल्याचे आवर्जुन सांगितले आहे.
फडणवीस यांना आव्हान देताना जाधव म्हणाले की, तुमच्याकडे सर्व यंत्रणा आहेत तुमच्याकडे मस्ती देखील आहे. अशी तपास यंत्रणा लावा आणि मी ५ जरी फोन केला असेल तरी मी राजकारणातून संन्यास घेईल. मोहित कंबोज ही पाळलेली भटकी कुत्री आहेत अशी जहरी टिका जाधव यांनी केली आहे.