Just another WordPress site

बॉयफ्रेंडवरुन दोन तरुणींमध्ये झिंज्या धरत जोरदार हाणामारी

यवतमाळ येथील घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल,बागेत राडा

यवतमाळ दि २८(प्रतिनिधी)- एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना महाराष्ट्रात यवतमाळच्या वणी तालुक्यातील शिवाजी पार्क लव्हर्स पॉईंट येथे घडली आहे. बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची ही हाणामारी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

यवतमाळ मधील एक तरुण दोन मुलींसोबत रिलेशनमध्ये होता. पण घटनेच्या दिवशी दोन्ही तरूणी आमनेसामने आल्या. त्यामुळे तो बाॅयफ्रेंड माझाच म्हणत पहिल्यांदा दोन्ही मुलींमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावसन थेट हाणामारीत झाले. दोघींनीही एकमेकींना धक्काबुक्की करून लाथांनी मारहाण करायला लागल्या. एकमेकींचे केस ओढून अश्लील भाषेत शिवीगाळ करायला लागल्या. अनेकांनी या फ्रिस्टाईलचे चित्रीकरण केले. अखेर उद्यानाच्या सुरक्षा रक्षकाने या दोघींनाही उद्यानाबाहेर हाकलून लावले. तेंव्हा हा वाद शांत झाला. शुभम राय नावाच्या ट्विटर युजरने @viralkida या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

GIF Advt

सोशल मीडियावर अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दोन दिवसापुर्वी गोरखपुरमधील दोन मुलींच्यस हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण अलीकडे मुलींच्या हाणामारीच्या घटना वाढल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसून आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!