Latest Marathi News
Ganesh J GIF

फक्त आडनावामुळे मला डावललं जात असेल तर चुकीचे..

भाजपाच्या या महिला खासदाराची उघड नाराजी, पक्षाकडून तिकीट कापले जाण्याची जोरदार चर्चा

जळगाव दि २१(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. महाराष्ट्रात तर भाजपाने ४५ जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. पण यावेळी भाजपाकडून काही खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यात दोन महिला खासदारांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. पण याच दरम्यान एका महिला खासदारने यावर भाष्य केले आहे. त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.

भाजपा यावेळी लोकसभा निवडणुकीत काही खासदारांचा पत्ता कट करण्याची शक्यता आहे. यात बीडच्या खासदार पंकजा मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा समावेश आहे. अर्थात याचा अंतिम निर्णय होण्यास बराच कालावधी जाणार आहे. पण आता रक्षा खडसे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रक्षा खडसे म्हणाल्या की, मी एकनाथ खडसेंची सून म्हणून माझी ओळख ठेवलेली नाही. रक्षा खडसे हे नाव लोकांमध्ये आज पोहोचलेलं आहे. लोकांसाठी मी काम करतेय. खरंतर खडसे हे नाव माझ्या पाठीमागे आहे. एकनाथ खडसे हे नाव माझ्या पाठीमागे असल्याने मला जर लोक डावलत असतील, तर हे चुकीचे आहे. त्याचबरोबर मी कोणत्या पक्षात जावं आणि कोणत्या नाही यावरून माझ्यावर कोणीही दबाव आनू शकत नाही. एकनाथ खडसेंचे विचार सध्या भाजपशी जुळत नसले तरी माझे विचार जुळतात. त्यामुळेच मी भाजपची खासदार आहे. असे म्हणत आपण भाजपातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपा काय निर्णय घेणार हे पाहणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण रक्षा खडसे यांना तिकिट नाकारल्यास रक्षा खडसे यांना सहानुभूती मिळू शकते. शिवाय ओबीसीचा मुद्दाही चर्चेत येण्याची शक्यता असल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आता यावर काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण या सर्व राजकीय घडामोडीमध्ये रावेर मतदारसंघात राजकीय स्पर्धा सुरु झाली आहे. दरम्यान रक्षा खडसे यांनी सलग दोन वेळा रावेर मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे.

रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीकडून सक्रिय राजकारणात आहेत. त्याचबरोबर एकनाथ खडसे हे रावेरमधून रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सून विरोधात सासरे असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!