Latest Marathi News
Ganesh J GIF

पाणीपुरीचे शाैकीन असाल तर ही बातमी एकाच बघाच

मुतारीत पाणीपुरी, धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

नवी मुंबई दि २३(प्रतिनिधी) – नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन शौचालयात पाणी पुरी ठेवली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शौचालयात ठेवलेल्या याच पाणीपुरीच्या  स्टाॅलवरुन शेकडो खवय्ये पाणीपूरी खात होते. हा किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे.

नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन शौचालयात पाणी पुरी ठेवली जात असल्याचा धक्क्दायक प्रकार उघडकीस आला आहे. वाशी रेल्वे स्थानकाच्या बाहेर अनेक पाणी पुरी आणि इतर खाद्य पदार्थ विकणारे विक्रेते अनधिकृतपणे बसतात. मात्र, आपला माल ठेवण्यास तिथे कोणतीही सोय नसल्याने हे खाद्य विक्रेते तेथील शौचालयाचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.महानगरपालिकेकडून होणाऱ्या कारवाईपासून वाचण्यासाठी देखील अनेक फेरीवाले असे कृत्य करतात. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

आजच्या शतकातील स्मार्ट सिटी आणि स्वच्छ शहर म्हणून परिचित असलेल्या नवी मुंबई शहरात चक्क सार्वजनिक मुतारीत पाणीपुरीचा स्टाॅल ठेवला जात आहे. अशी पाणीपुरी खाणाऱ्याचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणे गरजेचे आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!