Latest Marathi News

प्रेयसीला आय लव्ह यु म्हणण्यासाठी प्रेमवीर चढला विजेच्या खांबावर

प्रेमवीराचा व्हिडीओ व्हायरल, प्रेयसीला व्हिडिओ काॅल केला आणि...

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- प्रेमवीर त्यांच्या प्रेयसीला प्रेम पटवून देण्यासाठी नको ते धाडस करताना दिसत असतात. सध्या असाच एक प्रेमवीराचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या प्रेमवीराने आपले प्रेम पटवून देण्यासाठी विजेच्या खांबावर चढत आपला जीव धोक्यात टाकला होता. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

समोर आलेल्या व्हिडिओत एक तरुण आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी चक्क विजेच्या खांब्यावर चढला आहे. यातुन तो आपण प्रेयसीसाठी काय करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे इतक्या उंचावर चढून त्याने आपल्या प्रेयसीला फोन करत पूजा आय लव्ह यू म्हणत जोरजोरात ओरडू लागला. या तरुणाचा हा जीवघेणा प्रताप पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. काही लोक त्याला खाली उतरण्याची विनंती करत होते पण तो मात्र ऐकायला तयारच नाही. हा व्हिडीओ _itz_sonu_beawar या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो नेटकऱ्यांनी पाहिला आहे. पूजाच्या नादात त्यानं स्वत:चेच हवन करून घेतलं नाही म्हणजे झाले. अशा गंमतीशीर प्रतिक्रिया नेटकरी या व्हिडीओवर व्यक्त करताना दिसत आहेत. तर अनेकांनी त्याचा अनोख्या स्टाईलचे काैतुक केले आहे.

अनेकजण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी विजेच्या खांबावर, पाण्याच्या टाकीवर नाहीतर मोबाईलच्या टॉवरवर चढून जीव देण्याचा प्रयत्न करतात किंवा जीव देण्याची भिती दाखवत असतात पण हा तरुण चक्क विजेच्या खांबावर चढला होता. आता एवढा स्टंट केल्यानंतर पुजाने त्याच्या प्रेमाचा स्विकार केला का नाही याची माहिती मिळू शकली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!