तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे
एअरटेलच्या त्या घोषणेमुळे ग्राहकांना बसणार झटका, चेअरमन काय म्हणाले बघा
मुंबई दि १(प्रतिनिधी)- तुम्ही जर एअरटेलचे सिम वापरत असाल तर तुमच्या खिशाला दरवाढीची झळ बसणार आहे. कारण एअरटेल कंपनीने नुकतेच काही सर्कलमधील आपला कमी किंमतीचा ९९ रुपयाचा रिचार्ज प्लान बंद केला होता. कंपनीच्या या बेस प्लानची किंमत ९९ रुपयांऐवजी आता १५५ रुपये करण्यात आली आहे. कंपनी आता ग्राहकांना आणखी झटका देणार आहे.
एअरटेलच्या प्लानच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. भारती एअरटेल यावर्षी आपल्या सर्व प्लानच्या किंमतीत वाढ करण्याचा विचार करीत आहे.कंपनीचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी याबाबत सुतोवाच केले आहे. ते म्हणाले,”दूरसंचार व्यवसाय मध्ये मिळत असलेला फायदा खूप कमी आहे. होणारी दरवाढ सर्वच ठिकाणी केली जाईल. कंपनीने खूप मोठी गुंतवणूक केली आहे. याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. आम्ही प्लानच्या किंमतीत वाढ करण्याचा विचार करीत आहोत. ही दरवाढ भारतात आवश्यक आहे. यावर्षी ही दरवाढ होईल, असा मला विश्वास आहे. असे म्हणत त्यांनी होणाऱ्या दरवाढीचे समर्थन केले आहे. आता होणारी दरवाढ कंपनी एकदम करणार की टप्प्याटप्याने करणार याची स्पष्टता देण्यात आलेली नाही.
एअरटेलच्या नवीन १५५ रुपयाच्या प्लानची वैधता २४ दिवसाची आहे. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग देते. ग्राहकांना एकूण १ जीबी मोबाइल डेटा देते. याशिवाय, ग्राहक ३०० एसएमएसचा फायदा या पॅकमध्ये यूजर्सला देते.