Latest Marathi News
Ganesh J GIF

मैदानावर पंचगिरी सोडत अंपायर थिरकला चंद्रा गाण्यावर

भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, सामन्यात चंद्रा फिवर

मुंबई दि १(प्रतिनिधी)- क्रिकेट आणि चित्रपटसृष्टी यांचे नाते नेहमीच खास राहिले आहे. पण सध्या क्रिकेट ग्राउंडवरील एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यात चक्क अंपायरने चंद्रा गाण्यावर डान्स केला आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेचा आहे. एका मॅच दरम्यान अचानक चंद्रा हे गाणे वाजवण्यात आले.त्यावेळी अंपायरने पंचगिरी सोडत थेट या गाण्यावर डान्स करायला सुरुवात केली. अंपायर आपले निर्णय देताना विविध हातवारे करत असतात.पण या अंपायरने चक्क चंद्रा गाण्यावरच हातवारे करत धमाल उडवून दिली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. त्याला नेटकरी देखील तुफान प्रतिसाद देत आहे.

काही वर्षापूर्वी क्रिकेटच्या मैदानावरचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.त्यात अंपायर आपले निर्णय अनोख्या पद्धतीने देत होता.त्याला देखील तुफान प्रतिसाद मिळाला होता. पण या व्हिडिओमुळे क्रिकेट आणि चित्रपट यांचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!