
‘इस्लाम धर्म स्वीकारून लग्न न केल्यास अॅसिड हल्ला करेन’
धक्कादायक लव्ह जिहाद प्रकरण समोर, हिंदू संघटना आक्रमक
भोपाळ दि ८ (प्रतिनिधी)- मध्य प्रदेशात हिंदू तरुणीला धर्मांतर आणि लग्नासाठी धमकावणाऱ्या मुस्लीम तरुणाला अटक करण्यात आली आहे. जर तू इस्लाम धर्म स्वीकाराला नाहीस आणि माझ्याशी लग्न केलं नाहीस, तर तुझ्यावर अॅसिड हल्ला करेन अशी धमकी त्याने नर्सिंगची विद्यार्थनी असणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला दिली होती. आरोपी तरुण गेल्या काही दिवसांपासून तरुणीचा पाठलाग करत होता.या प्रकरणामुळे लव्ह जिहाद प्रकरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
या तरूणाच्या धमकीनंतर तरूणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.मोनू मन्सूरी असे पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या तरूणाने मूलीला रस्त्यावर थांबवत, तिच्यावर फुलं उधळली होती. मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात हा सगळा प्रकार घडला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला तरुणीचा मोबाइल नंबर मिळाला होता. त्याने व्हॉट्सअपला मेसेज पाठवून लग्नाचा प्रस्ताव नाकारला तर हत्या करेन अशी धमकी दिली होती. त्याचा हातात बंदूक पकडल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. मोनू मन्सूरी पाठलाग करत असताना तसंच फुलं उधळली तेव्हा मुलीने मदत मागितली होती. पळून जाण्याआधी आरोपीने मुलीला धर्मांतर केलं नाही तर अॅसिड हल्ला करण्याची धमकी दिली असे पोलिसांनी सांगितलं आहे.
तरुणीने हिंदू संघटनांकडे मदत मागितली आहे. त्यामुळे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.फसवणुक करत धर्मांतर केल्यास आणि खासकरुन लग्नासाठी असल्यास मध्य प्रदेशात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.