Latest Marathi News
Ganesh J GIF

‘तुम्हाला राहायचे असेल तर राहा, नाहीतर जाऊ शकता’

अजितदादांना विरोध करणाऱ्या शिंदे गटाला भाजपाचा दम, दिल्लीत भाजपाच्या दबावानंतर शिंदे गटाची माघार?

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील तीन पक्षाच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप नुकतेच पार पडले आहे. यात अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाचा तीव्र विरोध असतानाही अजित पवार यांना अर्थ खाते मिळाल्याने अनेक चर्चांना उधान आले आहे. अजित पवारांमुळे शिंदे गटाची भाजपाला गरज नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

शिंदे गटाच्या विरोधानंतर देखील अजित पवार यांना अर्थमंत्री खात्याचा कारभार देण्यात आला. त्याचबरोबर कृषीमंत्री पद देखील त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. शिंदे गटाची महत्वाची तीन खाती काढून घेण्यात आली आहेत. यावर वेगवेगळ्या चर्चा होत असताना संजय राऊत यांनी धक्कादायक विधान केले आहे. राऊत म्हणाले की, “अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळाल्यानंतर शिंदे गटाचे नेते टाळ्या वाजवत आहेत, मात्र, माझी माहिती अशी आहे की, अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळू नये म्हणून शिंदे गट दिल्लीत गेला होता. पण दिल्लीत त्यांचे कोणीही ऐकून घेतले नाही. भाजप नेतृत्वाकडून त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले की, तुम्हाला राहायचे असेल तर राहा, नाहीतर जाऊ शकता. याशिवाय अजित पवार यांना अर्थमंत्रीपद द्यायचे नसेल तर शिंदे गटाने ते स्वत:कडे ठेवून घ्यावे. मात्र, मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना द्यावे. असा प्रस्ताव शिंदेंना देण्यात आला. त्यानंतर अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यात आला असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत असे सांगत बंडखोरी केल्याचे सांगितले होते. पण आता अजित पवार अर्थमंत्री झाल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे अपात्र ठरणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे आगामी काळात अनेक दावे प्रतिदावे होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!