Latest Marathi News
Ganesh J GIF

बायकोला विहरीत ढकलून देत हत्या करत पतीचीही आत्महत्या

बायको जीव वाचवत असताना पाय ओढत पुन्हा बुडवले, घटनेने जिल्हा हादरला, कारण आले समोर

मुंबई दि १५(प्रतिनिधी)-बायकोबरोबर झालेल्या वादात पत्नीला विहरीत बुडवून स्वतः ही आत्महत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे.

सिद्धाराम सुभाष कारंडे आणि त्याची पत्नी सोनाली सिद्धाराम कारंडे असे मृत्यूमुखी पडलेल्या दांपत्याची नावे आहेत. लक्ष्मण बाबू आलदर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धाराम सुभाष कारंडे हा त्याची पत्नी सोनाली, तीन मुली आणि त्याची आजीसह राहत होता. सिद्धाराम यास दारू पिण्याचे व्यसन होते. काही दिवसापूर्वी यावरून त्याच्यांत वाद झाला. त्यानंतर सोनाली ही शेताकडे गेल्यानंतर सिध्दराम देखील दारू पिऊन शेतात गेला. शेतात त्यांची भेट झाल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद सुरु झाला. यामुळे संतापलेल्या सिद्धरामने सोनालीला मारहाण केली. त्यानंतर त्याने तिला विहरीत ढकलून दिले. त्यावेळी लक्ष्मण आलदर हा पळत जाऊन विहिरीत उडी मारून सोनालीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस सोनाली या विवाहितेचा पती सिद्धाराम याने विहिरीत उडी मारली आणि आपल्या पत्नीचा पाय ओढून विहिरीतील पाण्यामध्ये नेले यात तो देखील बुडाला. पण लक्ष्मन यांनी कसाबसा आपला जीव वाचवला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली.

या घटनेची फिर्याद लक्ष्मण अलदर यांनी १४ जुलै रोजी सांगोला पोलिसात दिली आहे. सांगोला पोलीस अधिक तपास करत आहेत. अलीकडे पती पत्नीतील वादात वाढ झाली आहे. दरम्यान या घटनेने सांगोला तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!