मी पोलीस आहे, मला जेवणाचे बिल मागतो का?
जेवणाचे बिल मागितल्याने दारुड्या पोलीसाचा धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल
परभणी दि ३ (प्रतिनिधी)- एका पोलीस कर्मचाऱ्याने परभणी शहरातील वसमत रोडवर एका ढाब्यावर जेवनाचे पैसे मागितल्याने धिंगाणा घातला आहे. यावेळी त्या कर्मचाऱ्याने मद्यपान देखील केले होते. या धिंगाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.
ओमकार मंगनाळे असे त्या पोलीसाचे नाव आहे. परभणी शहरातील वसमत रोडवरील रोहन केराब काळे यांच्या ढाब्यावर पोलीस कर्मचारी ओमकार मागनाळे इतर दोघा जणांसोबत रात्री जेवणासाठी आला होता. जेवण झाल्यानंतर जेवणाचे बिल मागनाळे यांना दिल्यानंतर त्याने ढाबा चालकाला “मी पोलीस कर्मचारी आहे. तुला माहित नाही का. तुला बघून घेईल” अशी धमकी ढाबा चालक काळे यांना दिली. यावेळी त्याने ढाब्यावर धिंगाणा देखिल घातला.आणि बिल न देता निघून गेला. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
पोलीसांनी रात्री पावणे दहाच्या सुमारास पोलीस कर्मचारी ओमकार मंगनाळे याच्या विरुध्द तक्रार दाखल केली त्यावरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.