Just another WordPress site

सासर कडून आईचा अपमान मग विवाहित तरुणीने केले असे काही

अपमान करणाऱ्या विरोधात नवी मुंबईतील पोलीसांनी अशी केली कारवाई

नवी मुंबई दि ३(प्रतिनिधी) – नवी मुंबईत सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरणे येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल आला आहे. सतत छळ होत असल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलीसांनी तिच्या पतीलाही अटक केली आहे.

GIF Advt

हर्षदा तरंगे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. हर्षदा यांनी २०२० मध्ये हेमंत तरंगे यांच्यासोबत लग्न केले. हर्षदा ही लग्नापासून कोपरखैरणे सेक्टर १८ येथील सासरी राहायला होती. मृत विवाहित महिलेवर सासरच्यांकडून वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात येण्यात येत होता. तसचे काही दिवसांपूर्वी विवाहितेच्या आईला घरी बोलावून सर्वांसमोर अपमानित करण्यात आले होते. आपल्या आईचा असा अपमान केल्याने तिला मोठा धक्का बसला होता. हा धक्का सहन न झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे हर्षदाची आई वैशाली वाघमोडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी पती हेमंत तरंगे, सासू मिताली तरंगे, सासरे अण्णासो, नणंद दीपाली मदने आणि धीर धवल तरंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. एैन सणासुदीत झालेल्या या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!