Latest Marathi News
Ganesh J GIF

चिंचवडमध्ये कलाटे व भाजप समर्थकांमध्ये जोरदार राडा

पोलिसांसमोरच दोन गटात जोरदार हाणामारी, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

चिंचवड दि २६(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी आज मतदान पार पडत आहे. पण त्याचबरोबर अनेक ठिकाणी वादाच्या घटना घडत आहेत. रात्री कसब्यात घडलेल्या राड्यानंतर चिंचवडमध्ये भाजप आणि अपक्ष उमेदवार कलाटे समर्थक जोडल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे.

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे समर्थक गणेश जगताप आणि भाजपाचे माजी नगरसेवक सागर अंघोळकर यांच्यात हाणामारी झाली आहे. जगताप यांनी भाजप कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावर शंभर मीटरच्या आत का थांबले असा सवाल विचारला, त्यामुळे दोन्ही बाजूंनी वादावादी सुरू झाली. आणि दोन्ही गट थेट हाणामारीवर उतरले. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत दोन्ही गटाला बाजुला केले आहे. या प्रकारानंतर संबंधित प्रकाराबाबत तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल आणि शहरात सुरळीत मतदान सुरू असल्याचा दावा पोलीस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी केला. दरम्यान सकाळीच राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या समर्थकांवर पोलीसांनी कारवाई केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती पण आता थेट हाणामारीची घटना गेल्याने निवडणुकीला गालबोट लागले आहे. या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत असून महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे. दोन मार्चला निकाल या निवडणूकीचा निकाल असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!