Just another WordPress site

कसब्यात पैसे न घेतल्याने भाजप नगरसेवकाची नागरिकांना मारहाण

कसब्यात रात्रीस खेळ चाले, नागरिकांचे आंदोलन, गंजपेठ परिसरात नेमके काय घडले?

पुणे दि २६(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड पोट निवडणूकीसाठी मतदान पार पडत असतानाच कसब्यात मात्र रात्री मोठा गोंधळ पहायला मिळाला. गंजपेठ परिसरात भाजपाच्या माजी नगरसेवकाने पैसे न घेतल्याने मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गंजपेठ परिसरात भाजपचे माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांचा भाऊ हिरा हरिहर पैसे वाटप करत होते. त्याला काही जणांनी विरोध केला असता, रात्रीच्या वेळी काही २० ते २५ जणांनी पैसे वाटायला विरोध का करता असे म्हणत काही जणांना मारहाण केली. रमेश बागवे यांनीही पैसे वाटण्यास विरोध केल्याने कांबळे कुटुंबियांना मारहाण आणि जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं राहण्याचा अधिकार नाही, अशा धमक्या दिल्याचा आरोपही बागवे यांनी केला आहे. दरम्यान  या प्रकारानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मिठगंज पोलीस स्टेशनबाहेर गर्दी करत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. अखेर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन तपास सुरु आहे.

GIF Advt

 

कसबा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेचे रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होत आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा करण्यात येत आहे. पण पैसे वाटण्याचा प्रकरणामुळे निवडणुकीला गालबोट लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!