त्या प्रकरणी न्यायालयाचा हडपसर पोलिसांना दणका
कारवाई न केल्याने बजावली कारणे दाखवा नोटीस, काय आहे प्रकरण
पुणे दि २०(प्रतिनिधी)- न्यायालयाने आदेश देऊन बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल करून न घेता महिलेला परत पाठवणाऱ्या हडपसर पोलिसांनी लष्कर न्यायालयाने दणका दिला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे हडपसर पोलिसांना उत्तर द्यावे लागणार आहे.

या प्रकरणात एका पिडीत महिलेने विशाल सुरज सोनकर त्यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. महिलेवर तिच्या तक्रारीमध्ये तिला लग्नाचे आमिष दाखवून संशयीत आरोपीने बलात्कार, अनैसर्गिक कृत्य केल्याचे तसेच तिची आर्थिक फसवणूक केल्याचे म्हटले होते. तसेच नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल केल्याची धमकी देत ते फोटो नातेवाईकांना पाठविल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी याप्रकरनात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर तक्रारदार महिला हडपसर पोलीस ठाण्यात जात न्यायालयाचा आदेश दाखवत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अॅड शाह यांनी न्यायालयाकडे तक्रारअर्ज केल्यानंतर याप्रकरणात लष्कर न्यायालयाने हडपसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे पोलीस काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.