पुण्यात कोयता गँगची दहशत आता शाळा परिसरात
शाळेतील मुलावर कोयत्याने हल्ला, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
पुणे दि ३१(प्रतिनिधी)- पुण्यात हातात कोयता घेऊन धुडगूस घालणा-यात सात अल्पवयीन मुलांनी बालसुधारगृहातून पळ काढल्यची घटना ताजी असतानाच,क्षुल्लक कारणावरुन एका विद्यार्थ्याने आपल्या विद्यार्थी मित्रावर कोयता हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.
समीर पठाण असे आरोपीचं नाव आहे तर विजय आरडे असं जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर आणि विजय दोघेही चांगले मित्र असून दोघांही बारावीत शिकतात. घटनेच्या दिवशी विजय आरडे हा समीर पठाण यांच्या मैत्रिणीशी बोलतत बस स्टॉपवर बसला होता. याचा राग आल्याने समीरने कोयत्याने विजयवर हल्ला केला. यात विजयच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तर विजयच्या बाजूला बसलेला आणखी एक विद्यार्थीही जखमी झाला आहे. पुण्यातील नूतन मराठी विद्यालय परिसरात हा प्रकार घडला.हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी कालच या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना समुपदेशन केले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असुन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. पुण्यात या गँगमधील आरोपींकडून दुकानदारांना, व्यावसायिकांना कोयत्याचा धाक दाखवत लुटले जाते होते. आता तर जीवघेणा हल्ला करेपर्यंत त्यांची मजल गेल्याने या घटना रोखणं आता पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.