Latest Marathi News

शिंदे सरकारमधील मंत्र्याचे शिंदे सरकारविरोधात उपोषण

शिंदे सरकारला घरचा आहेर,मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने मोठा निर्णय

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार निवेदन देऊनही ते माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्याने शिंदे सरकारमधील राज्य मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या नेत्याने उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. हे उपोषण शिंदे फडणवीस सरकारला घरचा आहेर मानला जात आहे.

माजी आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे १ फेब्रुवारीला उपोषणाला बसणार आहेत. नरेंद्र पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत माथाडी कामगारांच्या संपाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “अनेकवेळा सरकारला निवेदने दिली आहेत. नुकतीच मुख्यमंत्री शिंदेंचीही भेट घेतली तसेच त्यांनाही संपाबाबत निवेदन दिले आहे. माथाडी कामगारांचे अधिकारी हे माथाडी मंडळस्वतःच्या बापाची जहागिरी समजत आहेत. त्यांच्याकडून कामगारांना न्याय देण्यात दिरंगाई केली जात आहे. काही ठिकाणी तर माथाडी कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे कामही झाले आहे. अशा अनेक प्रश्नासंदर्भात आम्ही वेळोवेळी माहीत मंत्र्यांना दिलेली आहे. परंतु आजही आम्हाला तारीख पे तारीख मिळत आहे. म्हणून आता आम्ही १ फेब्रुवारी रोजी संप करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे पाटील यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात ३६ माथाडी मंडळे आहेत, यात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात एकूण ११ माथाडी मंडळे आहेत. यात अन्य मंडळांच्या पुनर्रचना झालेल्या नाहीत, त्यामुळे माथाडी कामगारांचे धोरणात्मक प्रश्न प्रलंबित आहेत.

 

राज्यमंत्री पदाचा दर्जाचे असलेल्या महामंडळाचे अध्यक्ष असलेले नरेंद्र पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी विश्वासातील नेते आहे. त्यांनी आपल्या हातावर फडणवीसांच्या नावाचा टॅटू देखील गोंदवून घेतला आहे.मात्र माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरत असल्याचे त्यांनी उपोषणाचा इशारा देत आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!