Latest Marathi News

‘हे’ शहर असणार आता राज्याची नवी राजधानी

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, लवकरच कार्यालयाचे होणार स्थलांतर

दिल्ली दि ३१(प्रतिनिधी)- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आज मोठी घोषणा करताना विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल असे जाहीर केले आहे. आंध्र सरकारने २३ एप्रिल २०१५ रोजी अमरावतीची राजधानी म्हणून निवड केली होती.

जगन मोहन रेड्डी आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत दौऱ्यावर होते. यावेळी आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडीच्या बैठकीत उपस्थित लोकांना संबोधित करताना जगन मोहन रेड्डी यांनी ही घोषणा केली. मी तुम्हा सर्वांना विशाखापट्टणमला येण्याचे निमंत्रण देतो. ही आमची राजधानी असेल आणि आपण स्वतः विशाखापट्टणमला स्थलांतरित होत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही महिन्यांत आंध्रप्रदेशचे कार्यालय विशाखापट्टणम या बंदर शहरात हलवले जाणार आहे. आणि यानंतर इथून पुढे आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टणम हेच शहर असणार असल्याचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या बैठकी दरम्यान स्पष्ट केले आहे.टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू सरकारवर आंध्र प्रदेशातील विद्यमान वायएसआर काँग्रेस सरकारने जमीन घोटाळ्याचा आरोप केला होता. या वादग्रस्त घडामोडींनंतर सत्ताधारी रेड्डी सरकारने आंध्रप्रदेशची राजधानी विशाखापट्टणम येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे.

जगनमोहन रेड्डी सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वादग्रस्त आंध्र प्रदेश विकेंद्रीकरण आणि सर्व क्षेत्रांचा समावेशी विकास कायदा 2020 रद्द केला होता, ज्याचा उद्देश राज्यासाठी तीन राजधान्या स्थापन करण्याचा आहे.ज्यात विशाखापट्टणम (कार्यकारी राजधानी), अमरावती (विधानिक राजधानी) आणि कुरनूल (न्यायिक राजधानी) या तीन राजधान्या करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!