Latest Marathi News
Ganesh J GIF

समीर वानखेडे प्रकरणात या अभिनेत्रीचीही होऊ शकते चाैकशी?

वानखेडेंच्या कुटुंबियांची होणार सीबीआय चौकशी, अडचणीत वाढ , अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आर्यन खान प्रकरणात खंडणी मागितल्याचा आरोपांप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आता वानखेडे यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार आहेत.


समीर वानखेडे यांच्या बहिणीची आणि त्यांच्या वडीलांची उद्या सीबीआय चौकशी करणार आहेत. दोघांची सीबीआय चौकशी होणार आहे असे सांगण्यात आले आहे. आर्यन या या प्रकरणामुळे समीर वानखेडे सीबीआय चौकशीच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आर्यनला सोडवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानकडे २५ कोटींची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी त्यांची दोनवेळा सीबीआय चौकशी झाली आहे. न्यायालयाने वानखेडे यांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले असून, त्यांना येत्या ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. विशेष म्हणजे सीबीआय अधिकारी या प्रकरणात चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर एका पथकाने थेट समीर वानखेडे यांचं मुंबईतील घर गाठत छापा टाकला होता. वडिल आणि बहिणीची चाैकशी होणार असल्यामुळे आगामी काळात पत्नी क्रांती रेडकर आणि इतरांची चाैकशी होणार का हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान दक्षता समितीच्या अहवालाच्या आधारे सीबीआयने समीर, एनसीबीचे तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंग, गुप्तचर अधिकारी आशिष रंजन यांच्यासह के. पी. गोसावी आणि सॅनविल डिसोझा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

क्रांती रेडकर समीर वानखेडेंच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. त्यांच्यावर आरोप करण्यात आल्यापासूनच क्रांती सोशल मीडियावर पोस्टद्वारे आपली भावना व्यक्त करत असते. आता क्रांतीने लोकमान्य टिळक यांचे एक उदाहरण देत त्यांची ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही’ ही गोष्ट सांगत न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!