पुणे तिथे काय उणे! पुण्यात रिक्षाचा रुबाब मर्सिडीजवर भारी
पुण्यात रिक्षेच्या मदतीनं धावली आलिशान मर्सिडीज, व्हिडीओ व्हायरल
पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते त्यामुळे पुण्यात कधी कधी भन्नाट गोष्टी घडत असतात अशा या पुण्यात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एका रिक्षावाल्याने चक्क मर्सिडीजला धक्का दिल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे.
आजघडीला मर्सिडीज कार आणि रिक्षाची तुलना होऊच शकत नाही. पण पुण्यात मात्र वेगळे चित्र आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील रस्त्यावर एक आलिशान मर्सिडीज कार बंद पडली होती. यामुळे मर्सिडीज कार चालकाची चांगलीच पंचाईत झाली. अशावेळी त्या मर्सिडीज कारच्या मदतीसाठी एक रिक्षावाला धावून आला कारला रिक्षा ड्रायव्हरने टो करत आपल्या पायाने मर्सिडीज कारला पुढे ढकललं. यामुळे एक बंद पडलेली मर्सिडीज कार रस्त्यावर धावू लागली. आणि मर्सिडीजवाल्याच्या जीवात जीव आला.हा अजब-गजब प्रकार पाहणाऱ्या एका वाहनचालकाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा अनोखा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.