Latest Marathi News

या अभिनेत्री बडा अभिनेता म्हणाला तू कंटाळवाणी आहेस

कास्टिंग काऊच प्रकार पुन्हा चर्चेत, निर्मात्यावरही केले गंभीर आरोप

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- बॉलिवूडमधील अभिनेत्री समीरा रेड्डी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समीरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसते. तिने नुकतेच कास्टिंग काऊच बाबत धक्कादायक वक्तव्य केले आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.

एका मुलाखतीत समीराने सांगितले की “मी एक चित्रपट करत होते मला अचानक सांगण्यात आले की तुला या चित्रपट किसिंग सीन द्यायचा आहे. मात्र असा सीन आधी चित्रपट नव्हता. मला हे पटत नव्हते”, तेव्हा निर्माते मला म्हणाले “तू आधी मुसाफिर चित्रपटात असा सीन दिला आहेस यात द्यायला हरकत काय?” मी आधी असा सीन दिला म्हणजे प्रत्येक चित्रपटात देईन असा अर्थ होत नाही. तेव्हा मला सांगण्यात आले की “हे खूप काळजीपूर्वक हाताळ पण लक्षात ठेव आमच्याकडेदेखील दुसरा कलाकार आहे.” असे सांगत तिने कशाप्रकारे दबाव टाकलो जातो हे सांगितले.ती पुढे म्हणाली, “एका अभिनेत्याने मला सांगितले की तू कंटाळवाणी आहेस, तुझ्या मज्जा नाही, तसेच मी तुझ्याबरोबर पुढे काम करेन की नाही माहित नाही” असे सांगत आपला अनुभव सांगितला आहे.

समीराने २००२ मध्ये सोहेल खानबरोबर ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.तर तीने २०१४ मध्ये बिजनेसमॅन अक्षय वर्देशी लग्न केले. त्यांना दोन मुले असुन मुलाचे नाव हंस आणि मुलीचे नाव नायरा आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!