Latest Marathi News

राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारचा दिलासा

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भरपाईच्या रकमेत हेक्टरी दुपटीने वाढ

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा दुष्टचक्रात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागानं हा निर्णय जाहीर केला आहे.

नव्या भरपाईनुसार, जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी ६ हजार ८०० रुपयांऐवजी आता १३ हजार ६०० रुपये मिळणार आहेत. बागायत पिकाच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० ऐवजी आता २७ हजार रुपये मिळणार आहेत. तर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी १८ हजार ऐवजी आता मिळणार ३६ हजार रुपये मिळणार आहेत. नुकसानीची मर्यादाही वाढवली. दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंंत मदत मिळणार आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि शेतजमिनींचं मोठं नुकसान झालं होतं. बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून पीकं आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २२२३२.४५ लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास सरकारनं मंजूरी दिली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या निधीची तरतूद पुरवणी मागण्याद्वारे करण्यात येईल.

राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे सोयाबिय, कापूस यासह अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. पूरपरिस्थितीमुळे झालेल्या या नुकसानीची वाढीव मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!