पुण्यातील रिक्षाच्या बेमुदत बंदला मारहाणीचे गालबोट
बाईक टॅक्सी चालकाला मारहाण, उपनगरात रिक्षाची तोडफोड, व्हिडिओ समोर
पुणे दि २८(प्रतिनिधी)- बाईक टॅक्सीविरोधात पुण्यात रिक्षाचालकांनी आज बंद पुकारला होता. यावेळी रिक्षाचालकांनी RTO कार्यालयासमोर आंदोलनं देखील केले आहे. पण पुण्यात सुरू असलेल्या रिक्षा आंदोलनाला गालबोट लागल्याचं पहायला मिळाले रिक्षाचालकांनी बाईक टॅक्सी चालकांला मारहाण केली आहे.
या आंदोलनात सहभागी न होणाऱ्या रिक्षा फोडल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर तर एका बाईक टॅक्सीवाल्यालाही जमावाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बेकायदा बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकाच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.स्वस्त आणि जलद सेवा असल्यामुळे नागरिक बाईक-टॅक्सीला प्राधान्य देतात. पण, मोटार वाहन कायद्यानुसार खासगी वाहनांचा वापर करून प्रवासी सेवा देणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे अवैध बाईक-टॅक्सी बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून केली जात आहे. एकंदरीत आजच्या आंदोलनाला गालबोट लागल्याची चर्चा आहे.
काही रिक्षाचालक आंदोलनात सहभागी न होता रिक्षा चालवत होते. तेव्हा संपकरी रिक्षाचालकांनी या रिक्षा अडवत त्याच्या काचा फोडल्या. पुणे उपनगरात हे प्रकार घडलेले आहेत. हडपसर,वडगाव तसंच कात्रज परिसरातले व्हिडिओ समोर आले आहेत. रिक्षा संपाच्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने १७०० बस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर उतरवल्या होत्या.