Latest Marathi News
Ganesh J GIF

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्यपाल पदाचा राजीनामा देणार?

छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचे विधान भोवणार, राजभवनाकडून खुलासा

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या अक्षेपार्ह विधानामुळे राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत: पदमुक्त होण्याची इच्छा जवळच्या व्यक्तींकडे व्यक्त केली आहे. अशी माहिती समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार का? या चर्चांना उधाण आले आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहे’ असं म्हणून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी वादाला तोंड फोडले होते. पण, आठवडा उलटला तरीही राज्यपालांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्याचबरोबर त्यांना राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. राज्यपालांना आपल्या पदावरून मुक्त व्हायचे असेल तर त्यांना अगोदर पदाचा राजीनामा अथवा पदमुक्त होण्याबाबतचे पत्र राष्ट्रपतींना पाठवावे लागेल. त्यानंतर त्यांच्या पत्रावर कार्यवाही होईल. तसेच केंद्र सरकारकडून राज्यपाल कोश्यारी यांची बदली देखील होऊ शकते. मात्र, ही बदली होणे म्हणजे राज्यपालांवर कारवाई करण्यात आली,असा संदेश देशभरात जाण्याची शक्यता असल्याने राज्यपालांकडून स्वत:हून पदमुक्त होण्याची इच्छा राष्ट्रपतींकडे व्यक्त केली जाण्याची शक्यता आहे.
राज्यपालांबाबत माध्यमामध्ये येणारी बातमी चुकीची असल्याचे स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आले आहे.

राज्यपालांनी पदमुक्त होण्याबाबत किंवा राजीनामा देण्याबाबत कुठलीही इच्छा व्यक्त केलेली नाही, असेही सांगण्यात आले आहे. राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे पदमुक्त होण्याबद्दलची इच्छा व्यक्त केली असल्याचे बोलले जात होते. त्याबाबत राजभवानकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!