भारतीय क्रिकेटपटू फिट दाखवण्यासाठी इंजेक्शन घेऊन खेळतात
निवडकर्ते चेतन शर्मांचा स्टिंगमध्ये गौप्यस्फोट, रोहित विराटला म्हटले अहकांरी
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट सध्या एका स्टिंग ऑपरेशनमुळे चांगलेच हादरले आहे. भारताचे निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी एका स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. भारतीय खेळाडू हे फिटनेससाठी खास इंजेक्शन घेत असल्याचा दावा त्यांनी स्टिंग आॅपरेशनमध्ये केला आहे. पण या खुलाशामुळे भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
भारतीय संघाचे निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी एका चॅनलच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे ते म्हणाले की, ” भारतीय संघात खेळण्याच्या लालसेपोटी हे खेळाडू अनफिट असूनही फिटनेस चाचणीपूर्वी अशी इंजेक्शन्स घेतात, ज्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता वाढते आणि डोपिंग चाचणीही त्यांना पकडत नाही. या विशेष प्रकारच्या इंजेक्शनच्या आधारे ते ही फिटनेस चाचणी उत्तीर्ण होतात. या खेळाडूंना हे देखील माहित आहे की डोप चाचणीमध्ये कोणते इंजेक्शन येईल आणि कोणते नाही. या बनावट फिटनेस गेममध्ये अनेक मोठे क्रिकेटर्स सामील आहेत. प्रत्येक खेळाडूला संघातून वगळण्याचा धोका असतो आणि त्यामुळे तो इंजेक्शन देऊन स्वत:ला तंदुरुस्त ठेवतो. अनफिट खेळाडू पेन किलर इंजेक्शन घेत नाहीत कारण त्यांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असते.” असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर गांगुलीने रोहितची बाजू घेतली नाही पण त्याला विराट कधीच आवडला नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात कोणतीही लढाई नाही पण अहंकार आहे. दोघेही अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यासारख्या बड्या फिल्म स्टार्ससारखे आहेत, असाही दावा चेतन शर्मा यांनी केला आहे.
चेतन शर्मा यांच्या स्टिंग आॅपरडशमुळे बीसीसीआयने मोठे पाऊल उचलू शकतात. कारण भारतीय क्रिकेटसाठी ही गंभीर बाब आहे. कारण अलीकडे भारतीय संघात जागा टिकवून ठेवणे खुप स्पर्धात्मक झाली आहे. भारतीय संघातील खेळाडू गेल्या काही दिवसांपासून फिटनेसमुळे आत बाहेर होत आहेत. त्यामुळे या खुलाशानंतर बीसीसीआय मोठा निर्णय घेऊ शकते.