Latest Marathi News
Ganesh J GIF

डोळे काढले,जीभ-गुप्तांगही कापले; विधवा महिलेची निर्घृण हत्या

टणा :बिहारच्या खगरियात हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विधवा महिलेवर अत्याचार करणाऱ्यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. आरोपींनी महिलेला बेदम मारहाण केल्यानंतर तिचे डोळे फोडले, जीभ आणि गुप्तांगही चाकूने कापले. पोलिसांनी तपास केला असता, सुलेखा देवी, असे या महिलेचे नाव असल्याचे समजले. जमिनीच्या वादातून महिलेची हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, महिलेचा पती बबलू सिंग आणि दिर करे सिंग यांचीही जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली होती. गावातील फुलुंग सिंग, महेंद्र सिंग, राजदेव सिंग, शंकर सिंग आणि कुलो सिंग यांच्यावर खुनाचा आरोप होता. या सर्वांविरुद्ध पसरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या

शनिवारी ही महिला शेतात गेली होती, तिथे आरोपींनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेने विरोध केल्यावर आरोपींनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत महिलेचे डोळे फाडून तिची जीभ आणि स्तन कापले. मारेकरी महिलेचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर अत्याचार करत राहिले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. छिन्नविछिन्न मृतदेह पाहून लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

आरोपींचा शोध सुरू

ज्या लोकांवर महिलेचा पती आणि मेहुण्याच्या हत्येचा आरोप आहे, त्यांच्यावरच महिलेच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!