जिंकलो! ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वाजला भारताचा डंका
भारताने पटकावले दोन ऑस्कर पुरस्कार, बघा विजेत्याची संपुर्ण यादी
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- मनोरंजन क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा भारतीयांचा वरचष्मा राहिला. भारताचे यंदा दोन ऑस्कर पटकावले आहेत.अमेरिकेच्या लॉस एंजेलिस इथल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडत असलेल्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात भारताचा बोलबाला दिसला.
भारताला ऑस्कर अवॉर्डसाठी तीन नामांकन मिळाली होती. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला, डॉक्युमेंटरी फीचर चित्रपट श्रेणीतील चित्रपट ऑल दॅट ब्रीद्स आणि मूळ लघुपट श्रेणीतील ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या गाण्याला अंतिम नामांकन मिळाली होती. त्यात एस एस एस राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे भारतीय चित्रपट विश्वामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. त्याचबरोबर ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ला सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट म्हणजेच बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी आहे. त्यात सोडून दिलेला हत्ती आणि त्याची काळजी घेणारी व्यक्ती यांच्यातील अतूट बंधन दाखवण्यात आले आहे. दिग्गज हाॅलीवूडपटांना मागे टाकत भारताने हा पुरस्कार मिळवला आहे. या यशाने भारतीयांच्या शिरपेचात दोन मानाचे तुरे रोवले गेले आहेत.
ऑस्कर विजेते
सर्वोत्कृष्ट चित्रपट- ‘Everything Everywhere All At Once’
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मिशेल योह
सर्वोत्कृष्ट अभिनेता- ब्रेंडन फ्रेझर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन-‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स’
सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग- ‘Everything Everywhere All At Once’
सर्वोत्कृष्ट ओरीजनल सॉंग- RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले- ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स’ या चित्रपटासाठी डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट
सर्वोत्कृष्ट व्हिजुअल इफेक्ट- अवतार
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म- ‘द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स’
सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म- ‘The Elephant Whisperers’
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म- ‘ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट’
सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार- रुथ इ कार्टेरला
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन फिल्म- द आयरीश गुडबाय
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- ‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट’
सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री फिचर फिल्म- नवलनी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- जेमी ली कर्टिस
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- के हुई क्वान