
भारताचा स्टार क्रिकेटपटू या महिला खासदाराच्या प्रेमात
साखरपुडा आणि लग्नाची तारीखही ठरली, गोलंदाचाजी धुलाई करणारा प्रेमाच्या बाॅलवर क्लिनबोल्ड
लखनऊ – भारतीय संघाचा क्रिकेटपटू तथा आयपीएलमधील केकेआर संघाचा धडाकेबाज खेळाडू रिंकू सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा ८ जून रोजी लखनऊमध्ये साखरपुडा समारंभ पार पडणार आहे. त्यामुळे रिंकूचे चाहते आनंदित झाले आहेत.
रिंकू आणि प्रिया सरोज यांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी वाराणसीतील ताज हॉटेलमध्ये ते लग्नगाठ बांधणार आहेत. लग्नसोहळ्यात देशभरातील प्रमुख राजकारणी, क्रिकेटपटू, चित्रपट तारे आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत होते. दोघांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ घेतला. रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांची भेट कशी झाली हे जाणून घेण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात.मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियाच्या एका मैत्रिणीला जिचे वडील क्रिकेटपटू होते ते रिंकूला चांगले ओळखतात. त्यांनीच पहिल्यांदा रिंकू आणि प्रियाची ओळख करून दिली. असेही म्हटले जाते की अलिगडमध्ये बांधलेले रिंकूचे नवीन घर प्रियाने फायनल केले आहे. प्रिया सरोज यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले असून सर्वोच्च न्यायालयात काही काळ वकिली केली. त्यानंतर, त्यांनी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारण एंट्री केली. रिंकू सिंह प्रामुख्याने भारतासाठी टी-20 क्रिकेट खेळतो. दरम्यान रिंकूने एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत. आतापर्यंत रिंकूने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 2 एकदिवसीय आणि 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रिंकूने एकदिवसीय सामन्याच्या 2 डावात 55 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या 38 धावा होती. याशिवाय, 22 टी-20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये, रिंकूने 46.09 च्या सरासरीने आणि 165.14 च्या स्ट्राईक रेटने 507 धावा केल्या आहेत. दरम्यान रिंकू सिंगचे वार्षिक उत्पन्न सुमारे 60 ते 80 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. 2024 मध्ये रिंकू सिंगची एकूण मालमत्ता सुमारे 8 कोटी रुपये असल्याचा अंदाज होता.
रिंकू सिंहची होणारी पत्नी ही समाजवादी पक्षाच्या (सपा) खासदार प्रिया सरोज आहे. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९९८ रोजी वाराणसी येथे झाला. २६ वर्षीय सरोज यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या तिकिटावर मच्छलीशहर मतदारसंघातून विजय मिळवला आहे.