
या बड्या नेत्याच्या पत्नीचे राजकारणात येण्याचे संकेत
त्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण, राजकारणातील एंन्ट्री धमाकेदात होणार
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या पत्नी अमृता फडणवीस राजकारणात नाहीत पण त्यांनी केलेल्या राजकीय टीकेच्या, ट्विट्सच्या बातम्या होत असता्त. अमृता फडणवीस आणि विरोधी पक्षातील नेतेमंडळींमध्ये अनेकदा ट्विटवाॅर रंगलेल्या आहे. पण आता अमृता यांनी थेट राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
अमृता फडणवीस राजकारणात नाहीत पण त्यांनी केलेल्या टीकेच्या, ट्विट्सच्या बातम्या होतात. अमृता फडणवीस आणि विरोधी पक्षातील नेतेमंडळींवर अनेकदा हल्लाबोल केला आहे.अमृता फडणवीसांच्या मते राजकारण ही पूर्णवेळ देऊन काम करण्याचं क्षेत्र आहे. त्यामुळे जेव्हा मी राजकारणासाठी पूर्णवेळ देऊ शकेन तेव्हाच मी राजकारणात येईल, असे त्या म्हणाल्या आहेत.अमृत फडणवीस यांच्याकडे सध्या कोणतंही राजकीय पद नाहीये. मात्र, सध्या काम, समाजसेवा, मुलीला वेळ देणे, गायन यामुळे बरेच व्यग्र राहावे लागते. असेही त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे जर अमृता फडणवीस पूर्णवेळ राजकारणात येणार असतील तर देवेंद्र फडणवीसांच्या एका विधानाला छेद जाणार आहे. कारण वर्षाभरापुर्वी देवेंद्र फडणवीसांनी अमृता कधीही राजकारणात येणार नाही माझ्या घरातील कदाचित मी राजकारणातील शेवटचा व्यक्ती असेन असे सांगितले होते. राजकीयच नाही पण सामाजिक विषयांवर पण अमृता फडणवीस भाष्य करत असतात. आता त्या नेमक्या कधी राजकारणात येणार याची प्रतिक्षा असेल.
अमृता फडणवीस या जरी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्या तरी तितकीच त्यांची ओळख नाही.त्या अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. तसंच त्या गायिका आणि अभिनेत्री आहेत.अमृता फडणवीस यांची अनेक गाणी प्रसिद्ध झाली आहेत.त्या एक सामाजिक कार्यकर्त्यादेखील आहेत. त्यांची राजकारणातील एन्ट्री धमाकेदार असणार यात शंकाच नाही.