एल्विश यादव ड्रग्ज रॅकेटमध्ये या अभिनेत्रीचाही सहभाग?
एल्विश यादव ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा, गायकावरही आरोप, बाॅलीवूड कनेक्शनची शक्यता, या अभिनेत्रीच्या फोनमध्ये पुरावा....
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- बिगबाॅस शोचा विजेता एल्विश यादव सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. एल्विशवर रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याच्या आरोप आहे. तसेच त्याच्या मित्राला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच साप देशील जप्त करण्यात आले आहेत. पण आता या प्रकरणी आणखी एका अभिनेत्रीच सहभागी असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
रेव्ह पार्टी प्रकरणात एल्विश यादव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीच्या भागात रेव्ह पार्टी एल्विश यादव याच्याकडून ठेवण्यात आली. या पार्टीमध्ये सापाच्या विषाची नशा केली जात होती. त्याला राजस्थानमधून पोलीसांनी अटक केली आहे. पण आता त्याने याप्रमाणे धक्कादायक खुलासे केले आहेत. एल्विश यादव याने चौकशीदरम्यान सांगितले की, पार्टीसाठी सापांची व्यवस्था बॉलिवूड गायक फाजिलपुरियाने केली होती. गायक फाजिलपुरिया याचे नाव आल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान दुसरीकडे अभिनेता फैजान अन्सारी याने एल्विश यादववर गंभीर आरोप केले आहेत. त्याने अशी लेखी तक्रार दाखल केली आहे. एल्विश यादवची मैत्रिण आणि बिग बॉस शोमधील सह-स्पर्धक मनीषा राणीच्या फोनची तपासणी करावी. तिच्या फोनमध्ये एल्विशविरोधात पुरावा सापडेल, असा दावाही फैजान अन्सारीने केला आहे. ते पुरावे बाहेर आल्यानंतर एल्विशला तुरूंगात जावे लागेल असा दावा करण्यात आला आहे. मनीषा राणीने अद्याप याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या संपूर्ण प्रकरणात एल्विशननं स्वत:ला निर्दोष घोषीत केलं आहे. त्यानं सांगितल्यानुसार त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तशी पोस्ट त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केली होती. आता यावर नवीन काय खुलासे होणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सापांच्या विषाच्या पार्टीमध्ये काही बाॅलिवूड कलाकारांचा देखील समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईमध्ये अशा पार्टींचे कधी आणि कुठे आयोजन करण्यात आले याबद्दल देखील पुढील काही दिवसांमध्ये खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.
मनेका गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या पीएएफ संस्थेला माहिती मिळाली होती की, एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवतो. विषारी सापांचे व्हिडीओ शूट करतो. परदेशी मुलींचा ‘सप्लाय’ करतो. त्यामुळे त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या एल्विशवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.