धक्कादायक! गर्भवती महिलेची गळफास घेत आत्महत्या
पोटातील बाळही दगावले, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात, रुपाली सोबत नेमके काय घडले?
नाशिक दि ९(प्रतिनिधी)- यावल तालुक्यातील मनवेल गावात राहणाऱ्या एका गर्भवती महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. पोलीस यामागील कारणांचा शोध घेत आहेत.
शितल उर्फ रूपाली विजय कोळी असे मयत विवाहितेचे नाव आहे. शितल कोळी ही महिला आपल्या पती व कुटुंबासह वास्तव्याला होत्या. मंगळवार, ७ रोजी दुपारी घरातच छताच्या आडव्या लोखंडी एंगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. सदर प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच तीला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. विशेष म्हणजे सदर महिला गरोदर होती तिच्या पोटात पुरुष जातीचे अर्भक होते, ते देखील यात दगावले आहे. यावल पोलिस ठाण्यात भगवान कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.
शितल गर्भवती होती. तरीही तिने टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस तपास केल्यानंतर यामागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे.